मंगळवार, २२ मार्च, २०११

खेळ अणि मनासिकतेची घालमेल

सध्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची धामधूम सुरू आहे. अनेक दिग्गज प्लेयर्स ह्यानिमित्ताने आपल्या समोर रोज खेळत आहेत. ही स्पर्धा प्लेयर्स प्रमाणेच पंचांच्या निर्णयावर व त्यावर केलेल्या अपिलामुळे ही सतत चर्चेत राहिली आहे. भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात तर चर्चेला उधाण आले आहे. कोण कसा चुकला , कोणी bowling कशी केली , त्याने कशी विकेट फेकली असे विश्लेषण चौकाचौकात चालू आहे. तर धोनी चे काय चुकते अणि भज्जी ने कुठे बोंल टाकावा असे सांगणारे सल्लागार ही पावलोपावली भेटतात. टीवी चनेल्स वर क्रिकेट ची ब्यँट सुद्धा न पाहिलेले आपली मते देत असतात. ज्योतिष्याना ही आपली कला सादर करायची संधी मिलाली आहे अणि दोन ज्योतिषी वेगावेगले भविष्य सांगून आपलाच दावा कसा खरा हे पटवायला बघत आहेत. एकंदरीत खेळाच्या निमिताने लोकांच्या मानसिकतेचे अनेक पैलू समोर येताना दिसतात.
ह्या स्पर्धेच्या वेळी प्लेयर्स च्या मनासिकतेची पण कसोटी लगते. त्यात बरेसचे फेल होतात कही तरुन जातात. माझ्या मते ह्या सर्वात खिलाडुवृत्ति फार महत्वाची. प्रत्येक खेळासाठी निकोप स्पर्धा हाच निकष लागू होतो पण आज क्रिकेट मध्ये स्लेजिंग आल्या पासून त्याला युद्धाचे रूप आले आहे. विजयासाठी काहीही हाच हेतु पण असे करताना खेळातील प्रमाणिकता कमी होतेय. उदहारण घ्यायचे तर सचिन अणि पोंटिंग पेक्षा दुसरे असूच शकत नाही. पोंटिंगने खोटारडेपणाचा तर सचिनने सत्यावादाचा कळस गाठला आहे. 'Gentlemen Game ला काळे फासायचे काम ऑस्ट्रलियन खेळाडू पूर्वीपासूनच करत आहेत अणि पोंटिंग तर त्यांचा शिलेदार ! सचिनने दाखविलेला मार्ग ह्या लोकांच्या डोक्यात जाणारच नाही कारण तो संस्कृतीचा फरक आहे.
काहीही असो खेळ अणि मनासिकतेची घालमेल अशीच चालू राहणार पण सरतेशेवटी खेळातली निकोप स्पर्धा वाढीस लागली पाहिजे अणि प्रत्येक खेलाडूने प्रमाणिकपणे ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.1 टिप्पणी:

वियुष साकरकार म्हणाले...

एक सांगावस वाटते. मित्र म्हणून. थोड तपासून घ्यावं कारण काना मात्रा वगैरे इकडे तिकडे होत आहे. ते तुम्ही जिथे लिहिता त्याचा दोष आहे हे माहिती आहे पण एक सल्ला google.com वर जा-> search for "Indic translations" -> जो पण result येईल त्यातली पहिली लिंक घ्या-> डावी कडे scroll down आहे त्यातून मराठी निवडा म्हणजे फार सोप जाईल. धन्यवाद !! पुन्हा भेटूच :)